बाबा राम-रहीमच्या 'एमएसजी'ला सेन्सॉर बोर्डाची परवानगी

बाबा राम-रहीमचा 'द मॅसेंजर ऑफ गॉड' प्रदर्शित होण्याचा मार्ग साफ झालाय. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं हिरवा कंदील दाखवलाय.  

Updated: Jan 16, 2015, 08:59 AM IST
बाबा राम-रहीमच्या 'एमएसजी'ला सेन्सॉर बोर्डाची परवानगी title=

नवी दिल्ली : बाबा राम-रहीमचा 'द मॅसेंजर ऑफ गॉड' प्रदर्शित होण्याचा मार्ग साफ झालाय. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं हिरवा कंदील दाखवलाय. 

परवानगी मिळाल्यानं 'द मॅसेंजर ऑफ गॉ़ड' हा सिनेमा आता २३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या आठवड्यात १६ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता... पण, सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेत याला 'एफसीएटी'कडे पाठवला होता. 

महत्त्वाचं म्हणजे, सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला तर वादग्रस्त दृश्य हटविण्यात येतील, असं डेरा सच्चा सौदाचे प्रमुख आणि या सिनेमाचा हिरो गुरमीत राम रहीम सिंह यानं म्हटलं होतं. पण, सेन्सॉर बोर्डानंच या सिनेमाला परवानगी दिल्यानं आता त्यांच्यापुढचा प्रश्नच मिटलाय. हा सिनेमा आदिवासी समुदायाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकतो. राम रहिमच्या म्हणण्यानुसार, या सिनेमात देशभक्तीसोबत सामाजिक संदेश देण्यात आलाय. अनेक मुद्यांवर आपला सिनेमा जागरुकता निर्माण करेल असाही दावा राम-रहीमनं केलाय. 

६७ दिवसांत हा सिनेमा पूर्ण करण्याता आलाय. निर्माण, पटकथा लेखन, संगीत राम-रहीमनंच दिलंय. मुख्य भूमिकेतही तोच दिसतोय. सिनेमाचं बरचसं शूटींग हरियाणाच्या सिरसामध्ये झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.