या गाण्यात भारतीय संस्कृतीची अवहेलना होत असल्याचा आरोप

 रॉक बॅण्ड कोल्डप्लेचा नवा व्हिडिओ अल्बम 'हीम फॉर द वीकेंड' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.(व्हिडीओमधील काही दृश्य पाहा बातमीच्या सर्वात खाली)

Updated: Feb 1, 2016, 04:51 PM IST
या गाण्यात भारतीय संस्कृतीची अवहेलना होत असल्याचा आरोप title=

मुंबई : रॉक बॅण्ड कोल्डप्लेचा नवा व्हिडिओ अल्बम 'हीम फॉर द वीकेंड' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.(व्हिडीओमधील काही दृश्य पाहा बातमीच्या सर्वात खाली)

या अल्बममधील एक गाणं 'ए हेड फुल ऑफ ड्रीम'वरुन वाद सुरु झाला आहे.

या गाण्यात भारतीय संस्कृतीची अवहेलना केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या गाण्याचं दिग्दर्शन बेन मोरने केलं असून या गाण्यात सोनम कपूरचीही झलक बघायला मिळते आहे.

सोनम या गाण्यात राजकुमारीच्या छोट्याशा रोलमध्ये दिसली आहे..सध्या तरी या अल्बमला विरोध सुरु झाला असून भारतात या अल्बमला बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच सोनमने तरी या अल्बममध्ये काम करायला नको होते, असं जाणकारांचं म्हणणं आहे.