'चल बेटा सेल्फी ले ले रे...' टीव्हीवरही बेदिक्कत दिसणार!

'चल बेटा सेल्फी ले ले रे...' या गाण्याला आणि 'बजरंगी भाईजान'च्या टीमला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय.

Updated: Oct 9, 2015, 03:18 PM IST
'चल बेटा सेल्फी ले ले रे...' टीव्हीवरही बेदिक्कत दिसणार! title=

मुंबई : 'चल बेटा सेल्फी ले ले रे...' या गाण्याला आणि 'बजरंगी भाईजान'च्या टीमला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय.

अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमातील 'चल बेटा सेल्फी ले ले रे' या गाण्यावर आक्षेप घेत तक्रारकर्ते राज राठोड यांनी सलमान खानविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. 

'बजरंगी भाईजान' हा चित्रपट येत्या रविवारी एका खाजगी चॅनलवर प्रसारित होणार आहे. यावेळी, टीव्हीवर हे गाणं दाखवलं जाऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या गाण्यात सलमान खान पायांत बूट घालून नृत्य करतोय, गुलाल उधळतोय... आणि बूट घालूनच त्यानं हनुमानाचा रथ ओढलाय, यामुळे हनुमान भक्तांच्या भावना दुखाल्यात, असं याचिकार्त्यांचं म्हणणं होतं. 

मात्र, न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दणका देत ही मागणी फेटाळून लावली. न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी सेन्सॉर बोर्डानं हिरवा कंदिल दिला असताना अशा प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही, असं सांगत ही याचिका फेटाळून लावलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.