गौरी खानचा वाढदिवस : आधी मैत्री, नंतर प्रेम आणि लग्न

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. शाहरुखशी लग्न करण्यापूर्वी गौरीचे नाव गौरी छिब्बर होते.

Updated: Oct 8, 2015, 05:39 PM IST
गौरी खानचा वाढदिवस : आधी मैत्री, नंतर प्रेम आणि लग्न title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. शाहरुखशी लग्न करण्यापूर्वी गौरीचे नाव गौरी छिब्बर होते.

गौरी ही कॉस्ट्यूम डिझायनर, प्रोड्यूसर, सामाजिक कार्यकर्ती अशी ओळख होती. गौरीला तीन मुलं आहेत. मुलगा आर्यन, मुलगी सुहाना आणि लहान मुलगा अबराम. गौरी ही रेड चिलीज एंटरटेनमेंटची को-फाऊंडर आहे. गौरीने आपल्या करिअरची सुरुवात इंटिरीअर डिझायनरपासून २०१२ला केली.

अधिक वाचा : शाहरुखचा मुलगा, अमिताभची नात आणि एक एमएमएस

ती अभिनेत्री नाही. मात्र, ग्लॅमर जगाशी निगडीत आहे. दोघंही बॉलिवूडमधील यशस्वी सेलिब्रिटीजपैकी एक मानले जाते. दोघंही वेगळ्या धर्माची आहेत. शाहरुख मुस्लीम तर गौरी हिंदू ब्राम्हण. निवृत्त मेजर रमेश छिब्बर यांची मुलगी. गौरीचे कुटुंब शाकाहारी आणि पुजाअर्चा करणारे.

अधिक वाचा : शाहरुख-काजोल पुन्हा शेअर करणार रूपेरी पडदा

गौरीने आपले शिक्षण दिल्लीत केले. १९८४मध्ये गौरी आणि शाहरुखची ओळख झाली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २५ ऑक्टोबर १९९१मध्ये लग्न केले. शाहरुखने आपल्या करिअरची सुरुवात लहान पडद्यापासून केली. १९८८मध्ये फौजीसाठी त्याचे खूप कौतुक झाले. त्यानंतर त्याचे 'सर्कस'मधून नाव अधिक चर्चेत आले. शाहरुखने 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' मोहब्बतें, दिवाना, देवदास, कोयला, चक दे इंडिया, रब ने बना दी जोडी, चेन्नई एक्सप्रेस आदी हिट सिनेमे दिलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.