मुंबई : सनी लियॉनची बॉलीवूडशिवाय दक्षिण भारतातील चित्रपटांसाठी मागणी वाढतेय. आगामी तेलुगू चित्रपट 'करंट थीगा'च्या एका आयटम सॉन्गसाठी सनी लियॉनला 'दीड कोटी' रूपये मानधन मिळाले असल्याची चर्चा आहे. मात्र या सॉन्गला सेन्सर बोर्डाने ए सर्टिफिकेट दिलं असल्याचं सांगण्यात येतं आहे, या चित्रपटाला आधी यू सर्टिफिकेट होतं, पण हे गाणं पाहिल्यानंतर सेन्सरबोर्डाने या चित्रपटाला ए सर्टिफिकेट दिलं असल्याचं सांगण्यात येतं आहे.
सनीचा या वर्षी रागिनी एमएमएस-२ रिलीज झाला, या चित्रपटाचा चांगलं यश मिळालं. यातील 'बेबी डॉल' गाणं वर्षातील सर्व गाण्यांमध्ये सुपर हिट ठरलं आहे.
यानंतर सनी लियॉनच्या अभिनयाची मागणी वाढलीय, काही दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग्स करण्याची आमंत्रणं सनी लियॉनला मिळाली आहेत.
सनीच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे सनी लियॉन आपल्या मानधनात वाढ करणार आहे.
सनी नुकताच रिलीज झालेल्या हेट स्टोरी -२ आणि बलविंदर सिंह फेमस हो गया या आयटम सॉन्गमध्ये दिसून आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.