'दंगल'ची कमाई आता 'पीके' पेक्षाही जास्त

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा दंगल अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे. या सिनेमाने आतापर्यंत भारतात 375 कोटींची कमाई केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 18, 2017, 02:12 PM IST
'दंगल'ची कमाई आता 'पीके' पेक्षाही जास्त

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा दंगल अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे. या सिनेमाने आतापर्यंत भारतात 375 कोटींची कमाई केली आहे. आमीर खानच्याच 'पीके' या सिनेमाचा रेकॉर्ड तोडला आहे.

आता या सिनेमाने अजुन एक नवा विक्रम केला असून फक्त मुंबईत 100 कोटींची कमाई दंगलने केली आहे.

आता पर्यंत कुठल्याच सिनेमाला हा विक्रम करता आलेला नाही. विशेष म्हणजे नोटबंदीच्या काळातही सिनेमाने इतकी घसघशीत कमाई केली आहे. परदेशातील आकडेवारी पाहता 500 कोटींच्या आसपास या सिनेमाची कमाई झाली आहे.

आता दंगल अजुन कमाईचे कोणते रेकॉर्ड करतो याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.