मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं खऱ्या अर्थानं बॉक्स ऑफिसवर 'दंगल' केलीय. वीकेंडला 100 कोटींचा गल्ला पार करणाऱ्या 'दंगल' सिनेमानं 400 कोटींचा आकडा पार केलाय.
'दंगल'ची भारतातील आतापर्यंतच्या कमाईवर नजर टाकली तर पहिल्याच दिवशी दंगलने तब्बल 30 कोटींचा पल्ला गाठला होता. दंगलची आठ दिवसांची एकूण कमाई पाहिली तर या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर भारतात जवळपास 280 कोटींचा व्यवसाय केलाय. 31डिसेंबरलाही या सिनेमाने तब्बल 33 कोटींची कमाई केली होती. आता सिनेमाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आकडे आले असून सिनेमाने ओव्हरऑल तब्बल 411 कोटींची कमाई केलीय.
दंगलचा बोलबाला दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर वाढताना दिसतोय. त्यामुळे हा सिनेमा पीकेचा रेकॉर्ड तोडू शकेल का, हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
आमिरसोबतच या सिनेमात फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा आणि साक्षी तन्वर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.