डॉन दाऊदच्या बहिणीची भूमिका साकारणार सोनाक्षी सिन्हा

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा असणारे 'हसिना- द क्वीन ऑफ मुंबई'. अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमवर आतापर्यंत अनेक फिल्म्स आल्या आहेत. आता दाऊदच्या बहिणीवर एका स्वतंत्र सिनेमाची जुळवाजुळव सुरू असल्याचं कळतंय. यात सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे.

Updated: Jan 11, 2016, 11:59 AM IST
डॉन दाऊदच्या बहिणीची भूमिका साकारणार सोनाक्षी सिन्हा  title=

मुंबई : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा असणारे 'हसिना- द क्वीन ऑफ मुंबई'. अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमवर आतापर्यंत अनेक फिल्म्स आल्या आहेत. आता दाऊदच्या बहिणीवर एका स्वतंत्र सिनेमाची जुळवाजुळव सुरू असल्याचं कळतंय. यात सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे.

दाऊदच्या बहिणीवर काढण्यात येणाऱ्या सिनेमाचे नाव 'हसिना- द क्वीन ऑफ मुंबई' असं आहे. यात हसिनाच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हाची निवड करण्यात आली आहे. 

दरम्यान, प्रेम रतन धन पायो फिल्मनंतर सलमान पुन्हा एकदा दबंग स्टाईल भूमिकांकडे वळणार असल्याचं स्पष्ट झालंय. सलमानच्या सुल्तान फिल्मची आता जोरदार चर्चा सुरू आहे. यात सलमानसोबत अनुष्का शर्मा असणार आहे.

गेले काही दिवस सुल्तानमध्ये सलमानसोबत कोण हिरोईन असणार याची चर्चा रंगत होती. इतरही अऩेक एक्ट्रेस या फिल्ममध्ये सलमानसोबत काम करण्यास उत्सुक होत्या. मात्र अखेर अनुष्काने यात बाजी मारलीये.