फिल्म रिव्ह्यू: गुन्हेगाराला पकडणार ब्योमकेश बक्षी

१९४०च्या काळातली या सिनेमाची कथा आहे... दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या सिनेमात सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत आहे. 

Updated: Apr 4, 2015, 02:20 PM IST
फिल्म रिव्ह्यू: गुन्हेगाराला पकडणार ब्योमकेश बक्षी title=

मुंबई: १९४०च्या काळातली या सिनेमाची कथा आहे... दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या सिनेमात सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत आहे. 

कथा :
कोलकातामध्ये राहणारा एका तरूण डिटेक्टिव्हच्या आयुष्यावरील हा चित्रपट आहे. १९४०च्या काळातील ही कथा आहे. नुकताच कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेला तरुण... त्याचं आयुष्यात एक वेगळं ध्येय असतं.. गुन्हेगारी, अन्याय, अत्याचार विरुद्ध त्याचा लढा सिनेमात रेखाटण्यात आलाय. चांगलं विरुद्ध वाईट अशी ही कथा आहे 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' चित्रपटाची..

लेखक शरदडिंडु बंडोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा आहे. यातला हिरो म्हणजे डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी जो आपल्या कल्पनेतून लेखकानं साकारला होता. याच व्यक्तिरेखेला दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी कशाप्रकारे रंगवलाय हे पाहणं तुमच्यासाठी इंटरेस्टिंग ठरणार आहे.. 

खरंतर शेरलॉक होम्स आणि ब्योमकेशमध्ये भरपूर साम्य आहे. अनेक हे पात्र शेरलॉक होम्सशी प्रेरीत आहे की काय...हे जाणवत राहतं.

अभिनय : 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतसाठी हा सिनेमा एक मोठा ब्रेक ठरू शकतो. कारण त्याच्या गेल्या दोन सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर 'शुद्ध देसी' फार काही कमाल करु शकला नाही आणि पीकेमधली त्याची व्यक्तिरेखाही काही ग्रेट नव्हती. ब्योमकेश बक्षी हे व्यक्तिरेखा त्यानं छान रंगवलीये आणि या यशाचा एक मोठा वाटा दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जी यांना देखील जातो. या सिनेमात सुशांत सिंहच्या opposite दिसतेय अभिनेत्री स्वस्तिका मुख्रर्जी.

सिनेमाची खरी गंमत म्हणजे, जर का तुम्ही लेखक शरदडिंडु बंडोपाध्याय यांची कादंबरी वाचली असेल तर मग सिनेमा पाहण्याची मजा काही औरच आहे. सिनेमा पाहताना आणखी एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे, अनेक ठिकाणी कथेचा संदर्भ लागत नाही. बऱ्याचदा सिनेमा कन्फ्युजिंग ही वाटतो.

'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' या सिनेमाला आम्ही देतोय अडीच स्टार्स...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.