दिया मिर्झाचं शुभमंगल सावधान!

लवकरच बॉलिवू़डमध्ये लग्नाचा आणखी एक बार उडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्री दिया मिर्झा, साहिल संघासोबत लवकरच दिल्लीत लग्न करणार आहे. एप्रिलमध्ये या जोडप्याचा साखरपुडा झाला होता. 

Updated: Jul 10, 2014, 08:40 PM IST
दिया मिर्झाचं शुभमंगल सावधान! title=
फाईल फोटो

मुंबई: लवकरच बॉलिवू़डमध्ये लग्नाचा आणखी एक बार उडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्री दिया मिर्झा, साहिल संघासोबत लवकरच दिल्लीत लग्न करणार आहे. एप्रिलमध्ये या जोडप्याचा साखरपुडा झाला होता. 

फिल्म बॉबी जासूसच्या यशानंतर दिया आपल्या खासगी आयुष्यात लक्ष केंद्रित करणार आहे. तसंही दिया फिल्म बॉबी जासूसची प्रोड्यूसर होती. 
दिया आपलं लग्न पंजाबी पद्धतीनं करण्याच्या तयारीत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, साहिल हा पंजाबी आहे आणि त्याचे कुटुंबिय आणि काही नातेवाईक दिल्लीमध्ये राहतात. यासाठी लग्न दिल्लीत करण्याचं प्लॅन करत आहेत. येत्या ऑक्टोबरला लग्नाची तारीख ठरवण्यात आलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.