अबब! अनुष्काचं 35 किलो वजन वाढलं

अनुष्का शर्माचे वजन अचानक 35 किलोनं वाढलंय. मात्र तिचं हे रुप सगळ्यांच आवडलंय. 

Updated: Jul 10, 2014, 08:45 PM IST
अबब! अनुष्काचं 35 किलो वजन वाढलं   title=
फाईल फोटो

मुंबई: अनुष्का शर्माचे वजन अचानक 35 किलोनं वाढलंय. मात्र तिचं हे रुप सगळ्यांच आवडलंय. 

सड-पातळ असलेल्या अनुष्काला अचानक वाढलेलं वजन सांभाळणं तिच्यासाठी कठीण होतं. अनुष्काचा आगामी सिनेमा बॉम्बे वेलवेट येणार आहे. त्या सिनेमात 60 दशकांतील मुंबई दाखवली आहे. सिनेमात अनुष्का गायिकेची भूमिका करणार आहे आणि या सिनेमामध्ये अनुष्कानं कमीत कमी दीडशे ड्रेस बदलले आहेत. 

यात अनुष्कानं 35 किलो वजनाचा गाऊन घातला आहे. या गाऊन घालण्यासाठी तिला दोन तास लागले होते आणि तो सांभाळण्यासाठी ही खूप त्रास झाला होता. 

त्यावेळेस दोन सहाय्यक तिच्यासोबत नेहमी हजर असत. हा गाऊन घालताना अनुष्का गाणं गाताना दिसणार आहे. या गाऊनला निहारिका भसीन खानने डिझाईन केलंय. 

नोव्हेंबरमध्ये रिलीज होणारा हा सिनेमा या वर्षातील महत्त्वाचा सिनेमा ठरणार आहे.  सिनेमात अनुष्कासोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.