अभिनेत्री दिया मिर्झाचा आज शुभविवाह!

भारताची पहिली मिस एशिया पॅसिफिक - प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची अभिनेत्री-निर्माती दिया मिर्झा हिचा शुभमंगल तिचा बिझनेस पार्टनर साहिल संघाशी आज हरियाणाजवळच्या मेहरोलीत होतंय. दिया मिर्झाचे अत्यंत जवळचे आप्तेष्ट-बॉलिवूडमधील सितारे म्हणजे लग्नाचे बिऱ्हाड दिया मिर्झाच्या मेहंदी-संगीत-शादी-रिसेप्शनसाठी दिल्लीकडे कालच रवाना झालेत.

Updated: Oct 18, 2014, 08:14 AM IST
अभिनेत्री दिया मिर्झाचा आज शुभविवाह!

मुंबई: भारताची पहिली मिस एशिया पॅसिफिक - प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची अभिनेत्री-निर्माती दिया मिर्झा हिचा शुभमंगल तिचा बिझनेस पार्टनर साहिल संघाशी आज हरियाणाजवळच्या मेहरोलीत होतंय. दिया मिर्झाचे अत्यंत जवळचे आप्तेष्ट-बॉलिवूडमधील सितारे म्हणजे लग्नाचे बिऱ्हाड दिया मिर्झाच्या मेहंदी-संगीत-शादी-रिसेप्शनसाठी दिल्लीकडे कालच रवाना झालेत.

‘रहना है तेरे दिल में’ या सिनेमापासून अभिनयात पदार्पण केलेल्या दिया मिर्झानं आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भारताचं नेतृत्व केलं आणि ती पहिली मिस एशिया पॅसिफिक ठरली. काही यशस्वी तर काही अयशस्वी सिनेमांनंतर दियानं चित्रपट निर्मितीत पदार्पण केलं आणि विद्या बालनला प्रमुख भूमिकेत घेऊन ‘बॉबी जासूस’ चित्रपटाची निर्मिती केली.

बंगाली आई-जर्मन पिता आणि सावत्र पिता मुस्लीम असलेल्या दिया मिर्झाचा ‘वर’ पंजाबी आहे. दिया मिर्झाच्या चेहऱ्यावर नववधूचा आरक्त लालिमा पसरलेला दिसतो. दियाला लग्नाविषयी आपला आनंद लपवता आला नाही. उद्यापासून मी एका नव्या जीवनाला आरंभ करतेय, साहिलशी माझी मैत्री होऊन दोन वर्षे झालीत. आमचं लग्न आर्य समाज पद्धतीनं होतंय, कारण माझे कुटुंबीय सर्वधर्मीय आहेत. नववधू दिया मिर्झाचा शादी का जोडा प्रसिद्ध फॅशन डिझायनर रितू कुमार यांनी डिझाइन केलाय. 

रितू कुमार यांनी दियाच्या लग्नाच्या पोशाखाबद्दल माहिती दिली. दिया तिच्या लग्नात घालणार असलेला ड्रेस शाही ठरणार आहे. कारण त्याचं डिझायनिंग रितू कुमार यांनी १५व्या शतकातील आग्रा शहरातील शाही स्त्रिया जसा कळीदार (अनारकली पॅटर्न) ड्रेस घालत तसा डिझाइन केला असून, त्यावर गोटा पट्टीनं एम्ब्रॉयडरी केली आहे. त्यावर सोनेरी जरी-बुट्टीचे डिझाइन केल्यानं हा पोशाख शाही लिबास ठरलाय. विवाहानंतरच्या भोजनासाठी दिया मिर्झा शांतनू निखिल यांनी डिझाइन केलेला ड्रेस तर संगीत कार्यक्रमासाठी फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाइन केलेला ट्रुझो (शाही विवाह ड्रेस) मध्ये दिसेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x