प्रेग्नंट करीनाची तब्येत बिघडली?

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमला घरी बोलवावे लागलेय. 

Updated: Dec 12, 2016, 03:20 PM IST
प्रेग्नंट करीनाची तब्येत बिघडली? title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमला घरी बोलवावे लागलेय. 

रात्री अचानक तिची तब्येत बिघडल्याने डॉक्टरांना तातडीने बोलवावे लागले. दरम्यान, आता सध्या ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून तिला आरामाचा सल्ला देण्यात आलाय. 

काही दिवसांपूर्वीच करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी तिच्या तब्येतीबाबत माहिती दिली होती. ती आणि बाळ दोघांचे आरोग्य चांगले आहे. तसेच बाळाचा विकासही योग्य पद्धतीने होत असल्याचे ते म्हणाले होते.