'दिलवाले' हा 'बिग बीं'च्या एका सिनेमाचा रिमेक

दिलवाले या सिनेमाचा प्रोमो लाँच करण्यात आला आहे. सिनेमामध्ये अॅक्शन, म्युझिक आणि डान्सचा जबरदस्त तडका पहायला मिळणार आहे. मात्र हा सिनेमा १९९० साली एका सिनेमाचा रिमेक असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. 

Updated: Dec 15, 2015, 10:23 PM IST
'दिलवाले' हा 'बिग बीं'च्या एका सिनेमाचा रिमेक title=

मुंबई : दिलवाले या सिनेमाचा प्रोमो लाँच करण्यात आला आहे. सिनेमामध्ये अॅक्शन, म्युझिक आणि डान्सचा जबरदस्त तडका पहायला मिळणार आहे. मात्र हा सिनेमा १९९० साली एका सिनेमाचा रिमेक असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. 

१९९० साली अमिताभ बच्चन यांचा 'हम' हा सिनेमा आला होता. ज्यामध्ये गोविंदा, रजनीकांत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. पण दिलवालेमध्ये वरुण धवन हा एकाच भावाच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे.

रोहित शेट्टी आणि टीमने जुनाच मसाला नव्या रुपात रसिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता दिलवाले सिनेमा किती प्रेक्षकांच्या मनात उतरतो हे येणारी वेळच सांगेल.