मुंबई: अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. घरगुती हिंसाचार कलमांतर्गत राजेश खन्ना यांची लिव्ह इन रिलेशनशीप पार्टनर अनिता अडवाणी हिनं अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबा विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय.
२०१३ साली अनिता अडवाणीनं अभिनेता अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला वांद्रे कोर्टात दाखल केला होता. त्या विरोधात अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबानं मुंबई उच्च न्यायालयात अपिल केलं होतं. त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयानं अनिता अडवाणी यांची याचिका फेटाळून लावली.
अनिता अडवाणी या राजेश खन्ना यांच्या पत्नी नव्हत्या आणि त्या लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत होत्या. त्यामुळे त्या फक्त राजेश खन्ना यांच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकल्या असत्या. त्यामुळं न्यायालयाने अनिता अडवाणी यांची याचिका फेटाळून लावत अभिनेता अक्षय कुमार, डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्ना यांना दिलासा दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.