मुंबई : मंगेश देसाई स्टारर एक अलबेला हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. बॉलिवूडचे द लिजेन्ड भगवान दादा यांच्या आयुष्यावरचा बायोपिक म्हणजे एक अलबेला हा सिनेमा.
भागवान आबाजी पालव अर्थातच भगवान दादा यांच्या जीवनातील काही महत्वाचे टप्पे या सिनेमात मांडण्यात आलेत.. त्यांचा स्ट्रगल, एका कॉमन मॅनपासून सुपरस्टार भगवानदादा पर्यंतचा तो प्रवास या सिनेमात रेखाटण्यात आलाय. खरंतर हा सिनेमा आजच्या तरुणवर्गासाठी एक ट्रीट आहे कारण एक अल्बेला या सिनेमाच्या निमीत्तानं द ग्रेट लिजेन्ड भगवान दादा यांच्या कारर्कीर्दीचा एक आढावा हा सिनेमा आपल्याला देउन जातो.
दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सिनेमाचा पूर्वार्ध छान झालय, पण खरी स्टोरी सिनेमाच्या उत्तारार्धात आहे. मी जसं म्हटलं या एक अलबेला या सिनेमात तुम्हाला भगवान दादा यांच्या कार्रीर्दीबद्दल कळतं, त्यांच्या फिल्मी प्रवासाबद्दल कळतं, पण सिनेमात कुठेतरी स्टोरी मिसिंग वाटते जी नंतर सिनेमाच्या सेकंड हाफमध्ये पहायला मिळते.
अभिनेता मंगेश देसाईनं साकारलेला भगवान दादा चांगला झालाय. सिनेमात विद्या बालननंही गीता बाली चोख पार पाडली आहे.
या सिनेमाला ३ स्टार्स