माझी पत्नी आता कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्त झालीय, असं अभिमानाने घोषणा माजी क्रिकेटपटू पंजाब काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी केली आहे. हो त्यांची पत्नी नोनी यांना स्टेज 4 चा कॅन्सर झाला होता. त्या गेल्या दीड वर्षांपासून स्तनाच्या कर्करोगाशी दोनहात करत होत्या. या लढाईत त्यांना नवज्योत सिंग सिद्धू यांनी मोलाची साथ दिली. सिद्धू यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं, की तुमची पत्नी फार काळ राहणार नाही. त्यांची जगण्याची शक्यता 5% पण नाहीय. अशा स्थिती त्यांनी नैराश न होता आयुर्वैदातील डाएट फॉलो केला आणि 40 दिवसांमध्ये कॅन्सरवर मात केला. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात त्यांनी त्यांच्या पत्नीचा डाएट सांगितला आहे. सिद्धूने सांगितले की, केवळ त्याची पत्नीच नाही तर स्वत:ही हा डाएट फॉलो करत त्याच्या फॅटी लिव्हरवरही मात केलीय.
ते या व्हिडीओमध्ये म्हणाले की, त्यांनी लोक म्हणतात ही श्रीमंत लोकांची आणि करोडो रुपयांचा औषधांची कमाल आहे. मग मला सांगा कडुलिंबाच्या पानांची किंमत काय आहे, कच्च्या हळदीची किंमत काय आहे, लिंबू आणि अप्पल साइडर व्हिनेगरची किंमत काय आहे.'
सिद्धू म्हणाले की, चवीनुसार आपण संपूर्ण शरीर खराब करतो. पण आम्ही संपूर्ण संशोधन आणि माहिती घेऊन आहार सुरू केला. त्यानंतर स्टेज 4 कॅन्सर फक्त 40 दिवसात बरा होऊ शकतो. कॅन्सरशिवाय हा आहार फॅटी लिव्हरलाही फायदेशीर आहे. सिद्धूनेही हा आहार घेतला आणि त्यांचे फॅटी लिव्हर गायब झाले आहे. त्याचं वजनही 25 किलोने कमी झालंय.
सिद्धू म्हणाले की, कॅन्सरला पराभूत करण्यासाठी जीवनशैली बदलावी लागते. कॅन्सरचा तोच उपचार फॅटी लिव्हरसाठी आहे. कर्करोगाच्या पेशींना साखर आणि कार्बोहायड्रेट्स देऊ नका, कर्करोगाच्या पेशी स्वतःच मरण्यास सुरवात करतील. त्याशिवाय त्यांच्या पत्नीला कॅन्सरच्या उपचारादरम्यान हर्बल चहा देण्यात आला होता. त्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, लवंगा आणि छोटी वेलची पाण्यात उकळून घ्यायची. या चहाची चव गोड करण्यासाठी थोडास गूळ टाकण्यात यायचं.
त्यांची पत्नी संध्याकाळी 6-6:30 पर्यंत रात्रीच जेवण करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता लिंबूपाणीने त्यांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. हा आहाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. यासोबतच आहारात दाहक आणि कॅन्सरविरोधी पदार्थ देण्यात आले. लिंबू पाण्यानंतर त्यासोबत कच्ची हळद, लसूण, एक लवंग आणि सफरचंद सायडर व्हिनेगर देण्यात आलं. अर्ध्या तासानंतर 10-12 कडुलिंबाची पाने त्यांना दिली जायची. सिद्धू यांनी कडुलिंबाची पाने आणि तुळस यांचं वर्णन 'हिरवे रक्त' आणि बेरी कॅन्सरसाठी सर्वात शक्तिशाली औषध असा केलाय.
त्यानंतर काजू, पांढरा पेठेचा रस (पांढऱ्या भोपाळ्याचा ज्यूस) 1 ग्लास ज्यूस देण्यात आला. रस तयार करण्यासाठी बीटरूट, गाजर आणि एक आवळा त्यात टाकला जायचा. मग दिवसाच्या शेवटी रात्रीचे जेवण, ज्यात भात आणि चपाती नसायची. त्यात फक्त क्विनोआ देण्यात आला, कारण हे एकमेव धान्य आहे जे दाहक-विरोधी आणि कर्करोगविरोधी आहे. नारळाचा वापर खूप फायदेशीर असल्याचेही त्यांनी त्यांनी सांगितलं.
सिद्धू यांच्या पत्नीला एक विशेष पाणी देण्यात आलं, ज्याची पीएच पातळी 7 होती. पाणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण आपल्या शरीराचा बहुतेक भाग त्याच्यापासून बनलेला असल्याने म्हणून कर्करोगाचा पराभव करण्यासाठी आपल्याला त्याकडे लक्ष देणे आवश्यक असतं, असं सिद्धू यांनी सांगितलं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)