IND VS AUS 1st Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची (Border Gavaskar Trophy) हायव्होल्टेज टेस्ट सीरिज सुरु आहे. शुक्रवार पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली असून पर्थ येथील स्टेडियमवर सामन्याचा पहिला दिवस पार पडला. दिवसाअंती टीम इंडिया सामन्यात 83 धावांनी आघाडीवर आहे. दरम्यान लाईव्ह सामना सुरु असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज लाबुशेन ( Marnus Labuschagne ) यांच्यात मैदानात बाचाबाची झाली. दोघांचं भांडण पाहून विराटने (Virat Kohli) देखील त्यात उडी घेतली आणि काहीकाळ मैदानात तणाव निर्माण झाला होता. सध्याच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
13 वी ओव्हर टाकण्यासाठी मोहम्मद सिराजकडे बॉल सोपवण्यात आला. यावेळी ओव्हरचा तिसरा बॉल हा सिराजने शॉर्ट ऑफ लेंथ फेकला, जो पिचवर टप्पा खाऊन आतमध्ये आला आणि लाबुशेनच्या पॅडवर लागला. बॉल स्टंप जवळ जात होता आणि सिराज त्याच्या फॉलोथ्रूमध्ये उचलू पाहत होता. पण सिराज बॉल उचलायला जाईल तितक्यात मार्नस लाबुशेनने आपल्या बॅटने बॉल दूर ढकलला. लाबुशेन च्या या कृतीमुळे सिराज नाराज झाला जातं त्यावेळी लोबूशेन क्रीजच्या आतमध्ये नव्हता. सिराजला बॉल उचलून स्टंपवर मारायचा होता, पण मार्नस लाबुशेन ने त्याला असं करू दिलं नाही. यानंतर सिराज त्याच्या जवळ गेला आणि त्याला रागाने बघू लागला. दोघांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली, हे पाहून विराटने बॉल मागितला आणि बॉल थेट स्टंपवर मारून याप्रकरणी आपली नाराजी व्यक्त केली. काहीवेळ मैदानात तणावाचे वातावरण होते. परंतु 21 व्या ओव्हरच्या सहाव्या बॉलवर सिराजने पुन्हा लाबुशेनला बॉल टाकला मात्र यावर लाबुशेन LBW बाद झाला. लाबुशेन 52 बॉल खेळून फक्त 2 धावाच करू शकला. तर मोहम्मद सिराजने दिवस अखेर पर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 2 विकेट्स घेतल्या. यात लाबुशेन आणि मिचेल मार्श (6) याचा समावेश होता.
हेही वाचा : पंत IPL कोणत्या टीमकडून खेळणार? मॅच दरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूने विचारला प्रश्न, ऋषभने सांगून टाकलं
Kohli siraj moment INDvsAUS pic.twitter.com/3tAUPr1KHc
— Whyrat kohli (brc_2903) November 22, 2024
टीम इंडियाचे फलंदाज पर्थ टेस्टच्या पोहिल्या इनिंगमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना स्वस्तात बाद करण्याचे आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजांवर होते. यावेळी कर्णधार बुमराहने नॅथन मॅकस्विनीच्या रूपाने ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट घेतली. त्यानंतर एकामोगोमाग एक विकेट्सची माळच लागली. यात बुमराहने सर्वाधिक 4, मोहम्मद सिराजने 2 तर हर्षित राणा याने 1 विकेट घेतली. गोलंदाज हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने विकेट मिळवली. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचे गोलंदाज लवकरात लवकर उर्वरित 3 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला ऑल आउट करण्याचा प्रयत्न करेल.
केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर) , ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड