व्हिडिओ : 'अगं बाई अरेच्चा-२'ची 'एक पोरगी...'

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आगामी सिनेमा 'अग बाई अरेच्चा २' लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतोय... याच सिनेमातलं 'एक पोरगी...' हे गाणं आत्ताच सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतंय. 

Updated: May 15, 2015, 09:15 AM IST
व्हिडिओ : 'अगं बाई अरेच्चा-२'ची 'एक पोरगी...' title=

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आगामी सिनेमा 'अग बाई अरेच्चा २' लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतोय... याच सिनेमातलं 'एक पोरगी...' हे गाणं आत्ताच सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतंय. 

सिनेमात सोनालीसोबतच धरम गोहील, सुरभी हांडे, चारुशिला साबळे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर या सिनेमात भरत जाधव, प्रसाद ओक, माधव देवाचाक्के, सिध्दार्थ जाधव ही मंडळी अतिथी कलाकार म्हणून दिसणार आहेत.  

सोनाली या चित्रपटात सहा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिने ‘शुभांगीची’ व्यक्तिरेखा साकारली असून तिची मनोवस्था सारखी बदलत असते. बदलत्या मनोवस्थेमुळे ती आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पुरुषांच्या प्रेमात पडते. आनंदी, दुःखी, गोंधळलेली असे विविध भाव या व्यक्तिरेखेमध्ये सामावले आहेत. या चित्रपटासाठी तिनं तब्बल तेरा किलो वजन कमी केलं.

केदार शिंदे दिग्दर्शित 'अग बाई अरेच्चा २' हा सिनेमा २२ मे रोजी प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.

व्हिडिओ पाहा...
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.