मुंबई : ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता पॉप जस्टीन बीबरने बुधवारी रात्री मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडिअममध्ये परफॉर्म केला. या शोला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.
कॅनडाचा सिंगर २३ वर्षीय जस्टीन बीबरची जादू भारतात चालली. लाईव्ह परफॉर्मेंससाठी हजारो चाहत्यांनी हजेरी लावली. मीडिया रिपोर्टनुसार जस्टीनच्या या ९० मिनिटांच्या शोसाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च झाले. सेटअपवर जवळपास २६ कोटी, बीबरची फी, ट्रॅवलिंग, हॉटेल आणि इतर मागण्यांवर २५ ते ३० कोटी रुपये खर्च झाले.
जस्टीनचा कॉनसर्ट हा आतापर्यंतचा सर्वात महाग कॉनसर्ट असल्याचं बोललं जातंय. या कॉनसर्टचं सर्वात महागडं तिकीट ७६ हजार रुपयांचं होतं. भारतीय पदार्थांचा शौकीन जस्टीनला भारतातील २९ राज्यांचं प्रतिनिधित्व करणारे पदार्थ वाढण्यात आले. जेवणासाठी सोने-चांदीच्या प्लेट होत्या.