मुंबई : बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीची व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या लहान मुलीने आपल्या अभिनयाने सगळ्यांचीचं मने जिंकून घेतली आहेत.
सलमान खानसारखा सुपरस्टार पडद्यावर असूनसुद्धा, हर्षाली मलहोत्रा या चिमुकलीने आपल्या निष्पाप हावभावाने, बोलक्या चेहऱ्याने तसेच उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
बाल कलाकार म्हणून नाव कमवलेली हर्षाली काही एकटी नाही. कित्येक बालकलाकारांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवून बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.
एक नजर टाकूयात अशाच काही प्रसिद्ध बाल कलाकारांवर...
शाहरूख खानचा 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलचं. त्यात खोडकर, मस्तीखोर लहान मुलीची भूमिका करणारी अंजली म्हणजेचं सना सईद. या चित्रपटानंतर ती करण जोहरच्या स्टुडंट ऑफ दि ईयर या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा' या शोमध्ये झळकली होती.
आंधळ्यावर बेतलेल्या ब्लॅक चित्रपटात छोट्या राणीची भूमिका करणारी चिमुकली म्हटजे आयशा कपूर. अवघ्या वयाच्या दहाव्या वर्षी तिने मुक्या बहिऱ्या मुलीची भुमिका केली होती. तिच्या या भूमिकेचे भरपूर कौतुकही झाले होते, तसेच अनेक पुरस्कारांनी तिला गौरवण्यात आले होते. आता अभिनेत्री म्हणून असलेला तिचा 'पाणी' हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'राजा हिंदुस्थानी' या चित्रपटात अमिर खानबरोबर प्रेक्षकांना आपल्या डॉयलॉगने मंत्रमुग्ध करणारा तो छोटा मुलगा म्हणजे कुणाल खेमू. मोठा झाल्यावर अनेक चित्रपटात कुणालने भूमिका केल्या आहेत. पण त्याच्या आणि सोहाअली खान यांच्या प्रेमसंबंधांमुळे तो जास्त चर्चेत राहीला. गोलमाल 3 मध्येसुद्धा कुणाल खेमूने काम केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.