सलमानला घाबरला शाहरुख ?

शाहरुख खानचा 'रईस' आणि सलमान खानचा 'सुलतान' बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देणार नाहीत

Updated: May 4, 2016, 03:43 PM IST
सलमानला घाबरला शाहरुख ? title=

मुंबई: शाहरुख खानचा 'रईस' आणि सलमान खानचा 'सुलतान' बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देणार नाहीत. रईस आणि सुलतान हे दोन्ही चित्रपट ईदच्या दिवशी रिलीज होणार होते. पण रईस आता 26 जानेवारी 2017 ला रिलीज होणार आहे. 

शाहरुखचं रेड चिलीज ऐंटरटेनमेंट आणि फरहान अख्तर, रितेश सिधवानी यांच्या एक्सल ऐंटरटेनमेंटनं रईसची निर्मिती केली आहे. रईसकडून मोठ्या अपेक्षा आहेत, त्यामुळे या चित्रपटाचं योग्य प्रदर्शन होणं आवश्यक आहे, त्यामुळे आम्ही रईस 26 जानेवारी 2017 ला रिलीज करणार आहोत, अशी प्रतिक्रिया निर्मात्यांनी दिली आहे. 

सलमानसोबत बॉक्स ऑफिसवर आपल्याला कोणतीही टक्कर द्यायची नाही, असे संकेत काहीच दिवसांपूर्वी शाहरुखनं दिले होते. सुलतान या चित्रपटामध्ये सलमान पहलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. सुलतानच्या आधी सलमानचा बजरंगी भाईजान आणि किक हे चित्रपट ईदलाच रिलीज झाले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 

शाहरुखचा रईस हा चित्रपट 1980मधल्या गुजरात तस्कर रईस खानच्या आयुष्यावर आधारित आहे.