फिल्म रिव्ह्यू :'अब तक छप्पन २'मध्ये नाना आणि फक्त नानाच!

बिग स्क्रिनवर नाना पाटेकर स्टारर 'अब तक छप्पन २' हा सिनेमा प्रदर्शित झालाय... १० साल बाद, एन्काऊंटर कॉप साधू आगाशे इज बॅक अगेन... 

Updated: Feb 27, 2015, 11:40 PM IST
फिल्म रिव्ह्यू :'अब तक छप्पन २'मध्ये नाना आणि फक्त नानाच! title=

 

सिनेमा : अब तक छप्पन २
दिग्दर्शक : ऐजाझ गुलाब
लेखन : निलेश गिरकर
संगीत : अमल मलिक
कलाकार : नाना पाटेकर, आशुतोष राणा, विक्रम गोखले, गुल पनाग, मोहन अगाशे

मुंबई : बिग स्क्रिनवर नाना पाटेकर स्टारर 'अब तक छप्पन २' हा सिनेमा प्रदर्शित झालाय... १० साल बाद, एन्काऊंटर कॉप साधू आगाशे इज बॅक अगेन... 

२००४ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या अब तक छप्पनचा दुसरा भाग प्रदर्शित झालाय. ऐजाझ गुलाब दिग्दर्शित नाना पाटेकर, विक्रम गोखले आणि मोहन अगाशे स्टारर 'अब तक छप्पन २' मध्ये 'अब तक छप्पन'च्या तुलनेत काय वेगळं आहे, पाहुयात...
 
कथा 
गृहमंत्र्यांकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट साधू आगाशे याला पुन्हा एकदा एका खास मिशनसाठी बोलावलं जातं. अंडरवर्ल्डचा  नायनाट करायला साधू अगाशे त्याच जोमानं आपली वेगळी फार्स तयार करतो. त्याच्या या संपूर्ण मिशनमध्ये त्याचे सहकारी त्याची साथ देतात. देशासाठी समाजासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या या एन्काऊंटर स्पेशालिस्टला अडचणींना सामोरं जावं लागतं. साधु अगाशेचं हे मिशन यशस्वी होतं का? त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्यांच्यातलाच एक दगाबाज असतो... याचा पत्ता जेव्हा साधू अगाशेला लागतो तेव्हा काय घडतं?? अशा काहीशा पार्श्वभूमिवरचा 'अब तक छप्पन २' हा सिनेमा आहे.
 
नाना पाटेकर 
नाना पाटेकरनं नेहमीप्रमाणेच सिनेमात खल्लास अभिनय केलाय... यंत्रणेला सुधारण्यासाठी साधु अगाशे या व्यक्तिरेखेत पुन्हा त्याच जोमानं त्याचं एनर्जेटीक कमबॅक केलाय. एक सीन आहे जिथे नाना अर्थातच साधू अगाशे आपल्या मुलाला गमावतो, त्या वेळी नानाच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांचा अभिनय लाजवाब वाटतो.

नानाच्या संपूर्ण परफॉर्मन्सविषयी सांगायचं झालं तर या वयातही ते आजच्या तरुण पिढीला लाजवतील असा अभिनय आणि असे स्टंट्स नानानं 'अब तक छप्पन २' या सिनेमात केलेत.  त्यांचा लूक त्यांचा वावर सुरेख आहे... अप्रतिम आहे... या कलाकारासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे पुन्हा एकदा नानानं दाखवून दिलंय.
 
आशुतोष राणा 
आसुताष राणानं यात ज्युनिअर कॉप सूर्यकांत थोरातची भूमिका बजावलीय. आशुताष राणाकडे या सिनेमात तसं त्याच्या ताकदीचं काहीच नाही? मग प्रश्न उदभवतो की त्याच्यासारख्या इतक्या प्रॉमिसींग नटानं अशा प्रकारची भूमिका का स्विकारावी जिथे त्याला त्याच्या टॅलन्टला काही वावच नाही.
 
गुल पनाग 
अभिनेत्री गुन पनागनं ही यात जवळ जवळ गेस्ट अपिअरन्स केलाय. तिच्या या भूमिकेला काहीही वजन नाही... काहीही महत्त्व नाही...  तिचा अभिनय कसा झालाय याबद्दल बालण्यापेक्षा तिनं हा सिनेमा का केलाय? या बाबत तिनं खरंच विचार करायला हवा.
 
दिग्दर्शन  
ऐजाझ गुलाबनं या सिनेमाचं दिगदर्शन केलंय. 'अब तक छप्पन'च्या तुलनेत हा सिनेमा कुठेही बसत नाही. दिगदर्शक ऐजाझकडे खरं तर नाना, मोहन आगाशे, विक्रम गोखले, आशुतोष राणासारखी तगडी कास्ट होती... त्यानं या सगळ्यांचा पुरेपूर वापर करुन घ्यायला हवा होता. पण, या सिनेमात तसं काहीच घडलेलं दिसत नाहीयं. सिनेमाची संपूर्ण मांडणी फसलीय. खरं तर या सिनेमाची स्टोरीलाइनच मिसींग आहे. 

दिग्दर्शकानं  फिचर फिल्म बनवलीय की टेलिफिल्म हेच समजत नाही... कारण सिनेमाचा लूक आणि टाईम ड्युरेशन पाहिल्यावर आपण  'क्राईम पेट्रोल' किंवा तत्सम एखादी क्राईम  सीरिजचा एपिसोड पाहतोय की काय? असा फील येतो. सिनेमाचे लोकेशन्स नेहमीप्रमाणे टिपिकल क्राइम सिनेमाच्या लोकेशन्स प्रमाणेच आहेत, यातले सान्स, स्टंट्स या सगळ्या गोष्टी रिपिट वाटत राहतात. काहीही नाविन्य़ या सिनेमात आपल्याला यात पहायला मिळत नाही.

शेवटी काय तर... 
तेव्हा 'अब तक छप्पन २' या सिनेमाला, केवळ नाना पाटेकर यांच्या अप्रतिम परफॉर्मन्ससाठी आम्ही देतोय २.५ स्टार्स...
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.