'सैराट' सिनेमाची गंमतीशीर ५ गुपितं

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तेव्हा सैराटची काही गुपितं बाहेर आली.

Updated: Apr 7, 2016, 12:24 PM IST
'सैराट' सिनेमाची गंमतीशीर ५ गुपितं title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाची जोरदार चर्चा आहे. सैराट सिनेमाचं म्युझिक बुधवारी लॉन्च करण्यात आलं, तेव्हा सैराटची काही गुपितं बाहेर आली.

१) सैराटचा हिरो आकाश (चित्रपटातील पर्शा) हा नागराज मंजुळेला एका रेल्वे स्टेशनवर दिसला होता.. तेथे त्याने सैराटच्या हिरोसाठी त्याची निवड केली. सैराटचा हिरो आकाश हा पहेलवान होता, त्याला सैराटसाठी वजन कमी करावं लागलं. 

२) सैराटची अभिनेत्री रिंकू राजगुरूला (चित्रपटातली आर्ची) बुलेट शिकून घ्यावी लागली. रिंकू एका गाण्यात ट्रॅक्टर चालवतानाही दिसणार आहे. 

३) रिंकू राजगुरूची सैराटसाठी अभिनेत्री म्हणून निवड झाली तेव्हा ती सातवीत होती, आता ती इयत्ता नववीत आहे. 

४) 'सैराटं झालं जी' हे गाणं दक्षिणेतल्या गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी गायलं आहे. चिन्मयी यांनी संगीतक्षेत्रात ए.आर रहमान यांच्यासोबत काम केलं आहे. चिन्मयी यांनी हे मराठी गाणं गायलं आहे. तर 'आताच बया का बावरलं' हे गाणं गायिका श्रेया घोषाल यांनी गायलं आहे.

५) सैराट हा अस्सल मराठी शब्द आहे, तुकारामांनीही त्यांच्या अभंगात अनेकदा सैराट शब्द वापरला आहे, सैराट म्हणजे सुसाट, वेगवान. सैराटचं संपूर्ण शुटिंग सोलापूरच्या करमाळा तालुक्यात झालं आहे. गाण्यात दिसणारी विहिर करमाळा तालुक्यातील आहे.