२४ वर्षांची असताना सपनाही ठरली होती 'गँगरेप'ची शिकार

'बिग बॉस सीझन ६'मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेली सपना भावनानी हिनं आज एक धक्कादायक खुलासा केलाय. 

Updated: Jul 9, 2015, 10:46 AM IST
२४ वर्षांची असताना सपनाही ठरली होती 'गँगरेप'ची शिकार

मुंबई : 'बिग बॉस सीझन ६'मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेली सपना भावनानी हिनं आज एक धक्कादायक खुलासा केलाय. 

२४ वर्षांची असताना आपणदेखील सामूहिक बलात्काराची शिकार ठरलो होतो, असं सपनानं सोशल वेबसाईटवर फेसबुक लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय. 

'Humans of Bombay’ (ह्युमन्स ऑफ बॉम्बे) या फेसबुक पेजवर सपनानं आपली कथा लोकांशी नेटिझन्सशी शेअर केलाय.  

सेलिब्रिटिंची हेअरस्टायलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या सपनाचे टॅटूजही चांगलेच गाजलेत. 

'वडिलांच्या मृत्यूनंतर मी शिकागोला गेले. एका ख्रिसमस इव्हला मी एकटीच बारमधून रात्री उशीरा बाहेर पडले... शॉर्ट ड्रेस आणि भडक लाल रंगाची लिपस्टीक मी लावली होती. मी २४ वर्षांचे होते आणि मी मद्यही घेतलं होतं. त्याचवेळेस समोरून  काही मुलांचा एक घोळका आला आणि त्यांनी माझ्या डोक्यावर बंदूक ठेवून माझ्यावर सामूहिक बलात्कार केला' असं सपनानं या पोस्टमध्ये म्हटलंय.

'त्यानंतर ही घटना डोक्यातून घालवण्यासाठी मला कित्येक वर्ष लागली पण मी माझा धीर कधीही खचू दिला नाही. मी अजूनही शॉर्ट ड्रेस घालते आणि भडक लाल रंगाची लिपस्टिकही लावते' असंही सपनानं म्हटलंय. 

य म्हटलंय 'फेसबुक' पेज वर...

"When I was 14, I used to talk to boys; drive motor cycles, smoke cigarettes and people in Bandra would often call me a...

Posted by Humans of Bombay on Wednesday, July 8, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.