शाहिद कपूरची मीरा राजपूतसोबतची पहिली सेल्फी लीक

काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरनं आपण मीरा राजपूतसोबत लग्न करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. हा विवाह वर्ष अखेरीस डिसेंबरमध्ये होणार होता. पण आता जूनमध्ये होणार असं बोललं जातंय. 

Updated: May 19, 2015, 03:15 PM IST
शाहिद कपूरची मीरा राजपूतसोबतची पहिली सेल्फी लीक title=

मुंबई: काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरनं आपण मीरा राजपूतसोबत लग्न करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. हा विवाह वर्ष अखेरीस डिसेंबरमध्ये होणार होता. पण आता जूनमध्ये होणार असं बोललं जातंय. 

यापूर्वी या कपलचा एकत्रितपणे एकही फोटो आला नव्हता. पण आता शाहिदचा आपल्या भावी पत्नीसोबतची पहिला फोचो पुढे आलाय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मीरानं बॅचलर पार्टी ठेवली होती. ज्यात तिचे खास मित्र उपस्थित होते. शाहिदही या पार्टीला हजर होता. लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणाऱ्या या जोडीनं पार्टी चांगलीच एंजॉय केली. 

फिल्मी वेबसाइट बॉलिवूडलाइफ.कॉमनं हा फोटो लीक केलाय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.