नवी दिल्ली: 'गब्बर इज बॅक' या वर्षातील सर्वात महत्वाचा आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा चित्रपट आहे, अशी समीक्षा करण्यात येत आहे. ट्विटरवर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या सिनेमात अक्षय कुमार, श्रुती हसन, प्रकाश राज, सोनू सुद आणि निकितन धीर हे मुख्य भूमिकेत आहेत.
'गब्बर' चित्रपट एका तामिळ चित्रपटाच रिमेक आहे. या चित्रपटात अक्षय एका सामान्य नागरिकाच्या भूमिकेत आहे, जो या देशातील भ्रष्टाचाराच्या निर्मुलनासाठी प्रयत्न करत आहे. चित्रपट राधाकृष्ण जगरलामुडी यांनी दिग्दर्शित केला आहे.
चित्रपटाची ट्विटरवर समीक्षा
गब्बर....या सिनेमाची एंट्री हिट होईल.
या सिनेमाच्या माध्यमातून शोलेची आठवण होत आहे. गब्बरची भूमिका प्रेक्षकांना पाहायला आवडेल.
अक्षय कुमारचा भ्रष्टाचाराबाबतची भूमिका पाहणे महत्वाचे असेल. त्यांने कसा लढा दिलाय याची खास उत्सुकता असेल.
प्रेक्षक अक्षय कुमारचा गब्बरचा अवतार पाहण्यास उत्सुक आहेत.
श्रुती हसनही अक्षयच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात अक्षयला कशी साथ देत आहे, हेही पाहणे औत्सुक्याचे आहे.
चित्रपटाचा ट्रक चांगला आहे. तसेच गाणेही चांगले लोकप्रिय झाल्याने या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत..
करीना पाहुणी कलाकारच्या भूमिकेत असल्याने तिला आपली छाप पाडण्यास वाव आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.