अभिनेता गौतम गुलाटी 'बिग बॉस -८' चा विनर!

‘दीया और बाती हम’फेम गौतम गुलाटीनं शनिवारी रात्री रिअॅलिटी शो 'बिग बॉस - हल्ला बोल'च्या आठव्या सिझनचा विजेतेपद जिंकलंय. त्यानं बिग बॉसच्या घरात १३२ दिवस घालवले आणि आपल्या चार स्पर्धकांना हरवलं. 

PTI | Updated: Feb 1, 2015, 07:49 AM IST
अभिनेता गौतम गुलाटी 'बिग बॉस -८' चा विनर! title=

मुंबई: ‘दीया और बाती हम’फेम गौतम गुलाटीनं शनिवारी रात्री रिअॅलिटी शो 'बिग बॉस - हल्ला बोल'च्या आठव्या सिझनचा विजेतेपद जिंकलंय. त्यानं बिग बॉसच्या घरात १३२ दिवस घालवले आणि आपल्या चार स्पर्धकांना हरवलं. 

पहिले या शोचं होस्टिंग बॉलिवूड अभिनेता सलमान खान करायचा. पण नंतर शोची मुदत एक महिना वाढवून निर्माती फराह खाननं याचं होस्टिंग केलं. फराहनं गौतमला ५० लाख रुपयांचं बक्षिस आणि ट्रॉफी देऊन विनर घोषित केलं.

जिंकल्यानंतर गौतमनं सांगितलं, 'मला विश्वास होत नाहीय की मी जिंकलोय. माझा प्रवास खूप उतार-चढावाचा होता. हा अनुभव मी आयुष्यभर विसरणार नाही. मी माझं कुटुंब, मित्र आणि प्रेक्षकांचे आभार मानतो. ज्यांनी बिग बॉसच्या प्रवासात मला पाठिंबा दिला. बिग बॉस जिंकणं म्हणजे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं.'

बिग बॉसच्या फायनलमध्ये त्याची प्रतिस्पर्धी करिश्मा तन्ना, प्रीतम सिंह, अली कुली मिर्जा आणि डिंपी सोबत होते. अली आणि डिंपी या सिझनमध्ये पहिले दोन चॅम्पियन बनले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.