ग्रेट ग्रँड मस्तीची दोन दिवसांत केवळ ५ कोटींची कमाई

प्रदर्शनापूर्वीच ऑनलाईन लीक झालेल्या ग्रेट ग्रँड मस्तीला पायरसीचा चांगलाच फटका बसला. 

Updated: Jul 18, 2016, 09:48 AM IST
 ग्रेट ग्रँड मस्तीची दोन दिवसांत केवळ ५ कोटींची कमाई title=

मुंबई : प्रदर्शनापूर्वीच ऑनलाईन लीक झालेल्या ग्रेट ग्रँड मस्तीला पायरसीचा चांगलाच फटका बसला. 

दोन दिवसांत या चित्रपटाने अवघ्या ५ कोटींची कमाई केलीये. रितेश देशमुख, विवेक ऑबेरॉय आणि आफताब शिवदासानी स्टारर या चित्रपटाने पहिल्या दिवशी अडीच कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी अडीच कोटींची कमाई केलीये. 

मस्तीच्या सीरीजमधील हा तिसरा चित्रपट. सिनेमाची कथा असो,पटकथा असो काहीही नावीन्य नाही. त्यामुळेच या रटाळ सेक्स कॉमेडीपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये