व्हिडिओ : 'हैदर'मधला शाहिद तुम्हाला खिळवून ठेवेल!

शेक्सपिअरच्या विविध नाटकांतील अनेक भन्नाट कॅरेक्टर्सचा मोठ्या खुबीनं वापर करणारा बॉलिवूडमधील दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा विशाल भारद्वाज आपल्या आगामी सिनेमासह सज्ज आहे.  

Updated: Jul 8, 2014, 03:32 PM IST
व्हिडिओ : 'हैदर'मधला शाहिद तुम्हाला खिळवून ठेवेल! title=

नवी दिल्ली : शेक्सपिअरच्या विविध नाटकांतील अनेक भन्नाट कॅरेक्टर्सचा मोठ्या खुबीनं वापर करणारा बॉलिवूडमधील दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा विशाल भारद्वाज आपल्या आगामी सिनेमासह सज्ज आहे. शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनित ‘हैदर’ या सिनेमाचा आज ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 
 
शाहिद विशालच्याच 2009 साली आलेल्या ‘कमिने’मध्ये आपल्या अभिनयाचा कस लावताना दिसला होता. ‘हैदर’ या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेता-दिग्दर्शकाची ही जोडगोळी पुन्हा एकदा एकत्र आलीय. शाहीदनं आपल्या या ट्रेलर लॉन्चविषयी ट्विटरवर माहिती दिलीय. या सिनेमातील काही फोटोही त्यानं आपल्या चाहत्यांशी शेअर केलेत. 

या सिनेमात तब्बू, के के मेनन आणि इरफान खान यांनीही महत्त्वाच्या भूमिका बजावल्यात. ‘हैदर’ 2 ऑक्टोबर 2014 रोजी प्रदर्शित होणार आहे. आप्लया भूमिकेच्या वेगवेगळ्या छटा शाहिद कसा साकारतोय, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरतंय, हे हा ट्रेलर पाहून तुमच्याही लक्षात येईलच... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.