चिमुरड्या हर्षालीला व्हायचंय सलमान अंकलसारखं 'सुपरस्टार'

'बजरंगी भाईजान' सिनेमात चिमुरड्या हर्षालीनं आपल्या निरागसपणानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या वाह-वाह मिळवलीय. या सात वर्षीय चिमुरडीला आता सलमान खानसारखंच एक मोठी सुपरस्टार व्हायचंय.

Updated: Jul 21, 2015, 07:55 PM IST
चिमुरड्या हर्षालीला व्हायचंय सलमान अंकलसारखं 'सुपरस्टार' title=

मुंबई : 'बजरंगी भाईजान' सिनेमात चिमुरड्या हर्षालीनं आपल्या निरागसपणानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या वाह-वाह मिळवलीय. या सात वर्षीय चिमुरडीला आता सलमान खानसारखंच एक मोठी सुपरस्टार व्हायचंय.

कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' या सिनेमात चिमुरड्या हर्षालीनं 'मुन्नी'ची महत्त्वाची आणि लक्षवेधी भूमिका निभावलीय. आपल्याला अभिनय आणि गायन पसंत असल्याचं हर्षाली म्हणतेय. शिवाय आपल्याला 'सलमान अंकलसारखं सुपरस्टार बनावयचंय' अशीही इच्छा हर्षाली व्यक्त करतेय. 

कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडा यांची हर्षालीच्या आईनं एकदा भेट घेतली होती. आणि एक दिवस त्यांना फोन आला की सलमान खान मुख्य भूमिकेत असलेल्या 'बजरंगी भाईजान'मध्ये त्यांच्या मुलीसाठी एक महत्त्वाची भूमिका आहे. 

यावेळी, पहिल्यांदा तर हर्षालीच्या आईला विश्वासच बसेना की आपल्या मुलीला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळतेय... ही गोष्ट स्वीकार करणं आमच्यासाठी कठिण होतं, असं त्या म्हणतात. 

सिनेमाच्या सेटवर सलमान माझ्यासोबत बार्बी गेम्स आणि टेबल टेनिस खेळत होता... सलमान अंकलसोबत ती मोबाईलवरही गेम खेळत होती. शिवाय, कबीर अंकलसोबत बार्बी गेम्स खेळायचे, असंही हर्षालीनं म्हटलंय.

करीना आंटी मात्र शूटिंगमध्ये व्यस्त होती त्यामुळे तिच्यासोबत गेम्स खेळण्याची संधी मिळाली नाही, असंही हर्षालीनं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.