मुंबई: एक नेता आहे... नाव मंदार... मुंबईवर त्याचं राज्य. त्याची पत्नी, मुलं आहेत... समर्थक आणि गुंडंही आहेत आणि आहे एक रखेल... तिचं नाव सोनिका... सोनिकाची मजबुरी म्हणून ती मंदार जवळ आली आणि त्याची रखेल बनून राहिली. मंदार जेव्हा राजकारणात व्यस्त होतो, तेव्हा सोनिका फोटोग्राफीचा क्लास घेते. तिथंच तिची भेट अक्षय सोबत होते. मग दोघांमध्ये प्रेम आणि मंदार व्हिलन... सोनिकाचा लढा... आणि गुंतागुंत...
या सर्वांमध्ये गोवा पोलिसांची भूमिका... आपल्या नवऱ्याला धडा शिकविण्यासाठी आतुर बायको आणि स्टोरीतील ट्विस्ट म्हणजे भूत... कारण नायिकेला होतो मतिभ्रम..
दिग्दर्शन
या चित्रपटाचं दिग्दर्शनही मतिभ्रमचा शिकार आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच टरंटिनोची फिल्म किल बिलची आठवण होते. ताबुत तोडून बाहेर आलेली अभिनेत्री. मग एक-एक करून ती बदलाही घेती. पण तिच्यात एवढी हिंमत, ताकद कुठून येते, हे कुणीच सांगत नाही. कदाचित हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांना अति समजूतदार समजून ते त्यांच्यावर सोडून देतो.
अभिनय
मंदारच्या भूमिकेसाठी सुशांत सिंहनं चांगला अभिनय केलाय. त्याला खूप दिवसांनी पडद्यावर बघणं चांगलं वाटतं. जय भानुशाली एखाद्या बाहुली सारखा भावहीन वाटतो. जेव्हा दिग्दर्शकांना त्याला भूत बनवून परत आणलं, तेव्हा उरली-सुरली कसरही पूर्ण झाली. तसंही त्याच्या नशिबात गाणेच आले आहेत. तो प्रत्येक सीनमध्ये क्युट दिसण्याचा खूप प्रयत्न करतो. सुरवीन चावलावरच संपूर्ण चित्रपटाचा फोकस आहे. तिची अॅक्टिंग ठीक आहे. पण फुटेजच्या हिशोबातनं तिचा परफॉर्मन्स मनाला भावत नाही.
संगीत
चित्रपटातील गाणे आधीच हिट झाले आहेत. पण चित्रपटातील या गाण्याचं टायमिंग आपल्याला हैराण करतं. कोणता सीरिअस सिन सुरू असतो.. आणि मध्येच रोमॅँटिंक गाणं... हे पाहून नक्की वाटतं प्रोड्युसर प्रेक्षकांना उल्लू समजतोय. सेक्स, नंगी पाठ, बदला, रेप आणि रोमँटिंक गाणे...
कथा
चित्रपटाची कथा खूप कमकुवत आहे. सर्वांचा अभिनय हा ऍव्हरेजच म्हणावा लागेल आणि दिग्दर्शन पसरलेलं आहे. प्रेक्षकांना खूप समजून घ्यावं लागतंय कारण दिग्दर्शकानं कुठंही कट बोलून कोणताही सिन कधीही जोडल्या सारखा वाटतो. आता जो सिन सुरू आहे तो भुतकाळातील की वर्तमानातला... हे प्रेक्षकांना कळणं कठीणच जातं...
जर आपल्याला हिंदी सिनेमातील सात्विक सेंसर्ड संभोग पाहायचाय किंवा या चित्रपटातील कलाकार तुमचे आवडते आहेत तरच हा चित्रपट पाहायला जा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.