'उडता पंजाब'ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील

मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाब सिनेमाला २ सीन कट करुन परवानगी देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीन कट केल्यामुळे सेन्सॉर बोर्डावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सुरुवातीला उडता पंजाब सिनेमातल्या ८९ दृष्यांना कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या. 

Updated: Jun 13, 2016, 04:46 PM IST
'उडता पंजाब'ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील title=

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाब सिनेमाला २ सीन कट करुन परवानगी देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीन कट केल्यामुळे सेन्सॉर बोर्डावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सुरुवातीला उडता पंजाब सिनेमातल्या ८९ दृष्यांना कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या. 

17 जूनला सिनेमा होणार रिलीज

अभिषेक चौबे दिग्दर्शित 'उडता पंजाब'मध्ये शाहिद कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर आणि दिलजीत दोसांज हे मुख्य भूमिकेत आहे. पंजाबमध्ये युवकांमध्ये वाढणारं ड्रग्जचं प्रमाण यावर हा सिनेमा बनवण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून देशात वादात सापडलेल्या या सिनेमाला मुंबई हायकोर्टाने हिरवा सिग्नल दिला आहे. येत्या २४ तासात सिनेमाला ए प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला दिले आहे. येत्या 17 जूनला सिनेमा रिलीज होणार आहे.