मुंबई : सिने अभिनेता सलमान खान हिट अँड रन खटल्याची आज सुनावणी होत आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सलमाननं आपल्यावरच्या सर्व आरोपांचा इन्कार केला होता.
२८ सप्टेंबर २००२ रोजी सलमान खानच्या लँड क्रूझर गाडीनं वांद्रे इथल्या अमेरिकन बेकरीच्या फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडलं होतं. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी आपण गाडी चालवत नव्हतो तर आपला ड्रायव्हर अशोक सिंग गाडी चालवत होता, असं सलमान खाननं शुक्रवारी कोर्टात सांगितलं होतं.
शिवाय दुर्घटना घडण्याच्या आधी आपण दारू प्यायलो नसल्याचंही, सलमाननं शुक्रवारी कोर्टाला सांगितलं. कोर्टानं सलमानला तब्बल ४१९ प्रश्न विचारले. त्यावेळी बहुतेक प्रश्नांना सलमाननं चूक आणि माहीत नाही, अशीच साचेबद्ध उत्तरं दिली होती.
दरम्यान सलमानवर मनुष्यवधाचा आरोप सिद्ध झाल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आता कोर्ट काय निकाल देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सलमान खान 'हिट अँड रन' खटल्यात आतापर्यंत काय काय घडलं, ते पाहूयात...
२८ सप्टेंबर २००२ ला वांद्रेतल्या अमेरीकन बेकरीच्या फुटपाथवर सलमानच्या लँड क्रूझरने ५ जणांना चिरडले, १ जण ठार
तब्बल ९ वर्षे वांद्रे कोर्टात सुरू होता सलमान खान हिट अँड रन खटला
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन खटला चालवण्याचे जून २०१३ ला आदेश, मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू
८० पेक्षा जास्त साक्षीदारांच्या साक्षी, त्यापैकी २७ साक्षीदारांची सरकारी पक्षातर्फे उलटतपासणी
२७ प्रमुख साक्षीदारांपैकी १२ प्रत्यक्ष साक्षीदार, त्यापैकी एक साक्षीदार दिलेल्या जबानीपासून पलटला
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.