ऋतिक-सुझान आणि मुलांनी असं केलं बाप्पाचं स्वागत!

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीला रोशन कुटुंबाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. यावेळी अभिनेता ऋतिक रोशननं आपल्या मुलांसोबत हा क्षण आपल्या घरी साजरा केला... तर ऋतिकची पूर्व पत्नी सुझान रोशन हिनं हा सण अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यासोबत साजरा केला.

Updated: Sep 19, 2015, 04:23 PM IST

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीला रोशन कुटुंबाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. यावेळी अभिनेता ऋतिक रोशननं आपल्या मुलांसोबत हा क्षण आपल्या घरी साजरा केला... तर ऋतिकची पूर्व पत्नी सुझान रोशन हिनं हा सण अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यासोबत साजरा केला.

हा क्षण ऋतिकनं आपल्या चाहत्यांशी ट्विटरवरून शेअर केलाय. या फोटोत ऋतिक, त्याचे आई-बाबा आणि दोन्ही मुल रेहान आणि ऋदान दिसत आहेत. दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांसोबत बाप्पाची पूजादेखील केली. 


फाईल फोटो

त्यानंतर ऋतिक स्वत: मुलांना ड्रॉप करण्यासाठी सुझानच्या घरी गेला, असं एका बॉलिवूड वेबसाईटनं म्हटलंय.

गणेश विसर्जनाला मात्र ऋतिकचे वडील राकेश रोशन एकटेच दिसले. यावेळी, ऋतिक मात्र अनुपस्थित राहिला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.