नाना पाटेकर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटणार ८० लाख रुपये

अभिनेता नाना पाटेकर राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. त्याच्या मदतीला मराठमोळा अभिनेता मकरंद अनासपुरेही होता. या दोघांनी पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांची मदत दिली. आता त्यापुढे एक पाऊल टाकल नाना पाटेकर फाऊंडेशनने ८० लाख रुपयांचा निधी गोळा केलाय.

Updated: Sep 19, 2015, 02:00 PM IST
नाना पाटेकर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटणार ८० लाख रुपये title=
छाया - डीएनए

मुंबई : अभिनेता नाना पाटेकर राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. त्याच्या मदतीला मराठमोळा अभिनेता मकरंद अनासपुरेही होता. या दोघांनी पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांची मदत दिली. आता त्यापुढे एक पाऊल टाकल नाना पाटेकर फाऊंडेशनने ८० लाख रुपयांचा निधी गोळा केलाय.

अधिक वाचा : नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत

नाना पाटेकर यांने दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी तसेच त्याला धीर देण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुमच्या मनात जरी आत्महत्येचा विचार आला तरी तुम्ही मला एक फोन करा, असे भावनात्मक आवाहन नानाने केले होते.

अधिक वाचा : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे या... नाहीतर...

आम्ही आमच्या परीने प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. लोक मदत करीत आहेत. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालाय. जे ८० लाख रुपये जमा झाले आहेत. ते पैसे गणपती विसर्जन झाल्यानंतर खान्देश आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येतील, असे नानाने म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.