'त्या'ने पत्नीसाठी बुक केला सुल्तानचा संपूर्ण शो

ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा सुल्तान हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ३६.५४ कोटींची बक्कळ कमाई केली.

Updated: Jul 8, 2016, 02:32 PM IST
 'त्या'ने पत्नीसाठी बुक केला सुल्तानचा संपूर्ण शो title=

हमीरपूर : ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा सुल्तान हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ३६.५४ कोटींची बक्कळ कमाई केली.

सलमानने त्याच्या फॅन्सला दिलेलं हे मोठं गिफ्ट होतं. सलमानचे फॅन्स जगभरात आहेत. त्याचे चाहते त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्याच्यासाठी फॅन मुमेंट अशी एक घटना हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरमध्ये घडलीये. 

शंकर मुसाफिर यांची पत्नी सलमानची मोठी चाहती आहे. आपल्या पत्नीला इंप्रेस करण्यासाठी या पठ्ठ्याने चक्क संपूर्ण सिनेमाहॉलच बुक केला. त्याने संपूर्ण शो बुक करत पत्नीला चांगलेच सरप्राईज दिले.