बॉक्स ऑफिसवरच्या कलेक्शनमध्ये मला रस नाही - आमिर खान

आमिर खानचा दंगल सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. पहिल्या दिवशी या सिनेमाने जबरदस्त कमाई करताना धमाकेदार ओपनिंग केलीये. 

Updated: Dec 24, 2016, 03:59 PM IST
बॉक्स ऑफिसवरच्या कलेक्शनमध्ये मला रस नाही - आमिर खान title=

मुंबई : आमिर खानचा दंगल सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. पहिल्या दिवशी या सिनेमाने जबरदस्त कमाई करताना धमाकेदार ओपनिंग केलीये. 

मात्र आमिरला या आकड्यात रस नाहीये. असं त्यानेच म्हटलंय बरं का. विश्लेषकांनी हा सिनेमा पहिल्या दिवशी ३०-४० कोटींची कमाई करेल असे म्हटले होते. 

याबाबत आमिरला विचारले असता तो म्हणाला, मला या आकड्यांमध्ये रस नाही. मी त्याचा विचार करत नाही. त्यापेक्षा मला नागरिकांची प्रतिक्रिया गरजेची वाटते. लोकांच्या हृदयापर्यंत हा सिनेमा पोहोचला पाहिजे असे मला वाटते. 

आमिर खानने या सिनेमात माजी कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारलीये.