मुंबई : सलमान खानसोबत 'जय हो'मध्ये दिसलेल्या डेझी शाहला 'हेट स्टोरी ३'मध्ये बोल्ड दृश्यांमध्ये पाहून अनेकांना थोडं आश्चर्यच वाटलं होतं.
'जय हो' नंतर आपल्याला चांगल्या भूमिका ऑफर झाल्या असत्या तर मी हेट स्टोरी ३ केलाच नसता, असं नुकतंच डेझीनं एका मुलाखतीत म्हटलंय.
'मला चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत... त्यामुळे मी खूप निराश झाले होते. परंतु, यामुळेच मला स्वत:वर खूप मेहनत घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं' असंही ती म्हणतेय.
असं असलं तरी 'हेट स्टोरी ३' करण्याचा कोणताही पश्चाताप डेझीला नाही. 'हेट स्टोरी ३ करणं हा निर्णय योग्यच होता, असं आत्ता मला वाटतंय. नवीन भूमिका आणि नवीन आव्हानं स्वीकारणं कोणत्याही अभिनेत्यासाठी चांगलंच असतं... आत्ता मला असं वाटतंय की जरी चांगल्या भूमिका मिळाल्या असत्या तरी एक आव्हान म्हणून हेट स्टोरी ३ मी स्वीकारलाच असता' असं डेझीनं म्हटलंय.