भारतात 'गब्बर' तर, पाकिस्तानात 'शोले'

भारतात अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय, तर पाकिस्तानात रिलीज झाल्यानंतर ४० वर्षांनी दाखवल्या जाणाऱ्या शोले सिनेमाने देखिल पंधरा दिवसात चांगली कमाई केली आहे. ‘गब्बर इज बॅक‘ हा अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. ‘गब्बर‘ने प्रदर्शनाच्या दिवशी १३ कोटी ५ लाख रुपये जमा केले.

Updated: May 4, 2015, 05:31 PM IST
भारतात 'गब्बर' तर, पाकिस्तानात 'शोले' title=

मुंबई : भारतात अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय, तर पाकिस्तानात रिलीज झाल्यानंतर ४० वर्षांनी दाखवल्या जाणाऱ्या शोले सिनेमाने देखिल पंधरा दिवसात चांगली कमाई केली आहे. ‘गब्बर इज बॅक‘ हा अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. ‘गब्बर‘ने प्रदर्शनाच्या दिवशी १३ कोटी ५ लाख रुपये जमा केले.

भ्रष्टाचारविरोधी स्वतःच मोहीम उघडून आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना अत्यंत कठोर शासन देतो. काहींना कायमची अद्दल घडवत भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरविणारा ‘नावाने झिरो, पण कामाने हिरो‘ असा आगळावेगळा गब्बर अक्षयने साकारला आहे.

पाकिस्तानात शोले
दुसरीकडे पाकिस्तानात शोले ४० वर्षानंतर प्रदर्शित झाला आहे, या सिनेमाला पाकिस्तानात चांगला प्रतिसाद मिळतोय, पाकिस्तानातील ५० टक्के लोकांनी शोले या आधी पाहिल्याने थिएटरमध्ये डॉयलॉग बोलण्यात चढाओढ लागल्याचं दिसून येत आहे. भारतातून पाकिस्तानात आलेला जुन्या चित्रपटात कमाई करण्यावर शोले चित्रपटाने आघाडी घेतली आहे, आखाती देशांतील मित्रांकडून व्हीसीआर कॅसेटवर हा चित्रपट यापूर्वी पाकिस्तानातील लोकांनी पाहिलेला होता. तो आज त्यांना पडद्यावर प्रत्यक्षात पाहायला मिळाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.