शिरिष कुंदरची 'क्रिती' वादात, 'बॉब'वरून चोरल्याचा दावा

एव्हाना तुम्ही शिरीष कुंदर दिग्दर्शित 'क्रिती' ही शॉर्ट फिल्म पाहिली असेलच... त्यावरच आता चर्चा सुरू झालीय... चोरल्या गेलेल्या कल्पनेची...  

Updated: Jun 24, 2016, 11:40 PM IST
शिरिष कुंदरची 'क्रिती' वादात, 'बॉब'वरून चोरल्याचा दावा title=

मुंबई : एव्हाना तुम्ही शिरीष कुंदर दिग्दर्शित 'क्रिती' ही शॉर्ट फिल्म पाहिली असेलच... त्यावरच आता चर्चा सुरू झालीय... चोरल्या गेलेल्या कल्पनेची...  

नाही... नाही... शॉर्ट फिल्मप्रमाणे ही काही काल्पनिक चोरी नाही तर... शिरिष कुंदरनं 'क्रिती' ही शॉर्ट फिल्म आपल्या एका शॉर्ट फिल्मच्या प्लॉटवरून चोरल्याचा दावा अनिल न्यूपान या एका फिल्ममेकरनं केलाय. 

अनिलची 'बॉब' ही नेपाळी शॉर्टफिल्म या दाव्याची पुष्टी करतेय का? तुम्हीच ठरवा...