‘पीके’ला ISIचं फंडिंग, शिवसेनेचा आरोप

PK हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे, अशी टीका आधी झाली. मात्र आता PK वर अधिकच गंभीर आरोप होतायत. PK सिनेमाला ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय तो शिवसेनेनं.

Updated: Jan 5, 2015, 08:22 PM IST
‘पीके’ला ISIचं फंडिंग, शिवसेनेचा आरोप title=

मुंबई: PK हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे, अशी टीका आधी झाली. मात्र आता PK वर अधिकच गंभीर आरोप होतायत. PK सिनेमाला ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय तो शिवसेनेनं.

शिवसेनेच्या नव्या आरोपांमुळं PK च्या वादात आणखीच भर पडलीय. आमीर खानच्या या नव्या चित्रपटासाठी ISIनं फंडिग केल्याचा सनसनाटी आरोप शिवसेनेचं मुखपत्र सामनातून करण्यात आलाय. शिवसेनेचा हा आरोप योग्य आहे की अयोग्य..?

  • शिवसेनेनं PK वर आरोप का केला?
  • शिवसेनेकडं आरोप करण्यासाठी काय पुरावे आहेत?
  • ISI आमीर खानच्या सिनेमात पैसा का गुंतवेल?

या तीन प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिवसेनेकडून एक कथित पुरावा पुढं करण्यात आला.

शिवसेनेचा पुरावा नंबर 1

शिवसेनेच्या मुखपत्रात एक फोटो छापलाय. दुबईत झालेल्या PKच्या प्रेस कॉन्फरन्सचा हा फोटो आहे. फोटोत निर्माता विधू विनोद चोपडाच्या बाजूला एआरवाय (ARY) डिजिटल असा बोर्ड दिसतोय. सामनातील वृत्तानुसार, एआरवाय डिजीटल ही पाकिस्तानी कंपनी आहे. पाकिस्तान आणि दुबईत या कंपनीचे टीव्ही चॅनलपासून अनेक उद्योगधंदे आहेत. कंपनीचे मालक अब्दुल रज्जाक याकूब यांचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि तालिबान्यांशी निकटचे संबंध आहेत. त्यामुळंच आमीर खानच्या सिनेमात ISIचा पैसा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.

शिवसेनेच्या आधी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही PK साठी ISI नं आर्थिक मदत केल्याचा आरोप केला होता. मात्र अब्दुल रज्जाक याकूब आणि पाकिस्तानची ISI संघटना यांच्यात संबंध असल्याचा आरोप शिवसेना कशाच्या आधारे करतंय, याचा उल्लेख मात्र सामनाच्या वृत्तात नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.