मुंबई : ‘सिंघम’, ‘वॉण्टेड’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता प्रकाश राज यांना ५० व्या वर्षी पुत्ररत्नाचा लाभ झालाय.
प्रकाश राज यांची दुसरी पत्नी पोनी वर्मा हिने बुधवारी गोंडस मुलाला जन्म दिला. आपल्यासाठी ही एक खूप आनंदाची बातमी आहे. आम्ही दोघेही खूश आहोत. आमचे हे बाळ आमच्या आयुष्यात खूप आनंद आणि चैतन्य घेऊन येणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी पुत्रप्राप्तीनंतर दिली.
प्रकाश राज यांनी २०१० साली पोनी हिच्याशी विवाह केला होता. त्याआधी त्यांनी ललिथा कुमारी हिच्याशी लग्न केले होते. मात्र, २००९मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ललिथापासून त्यांना मेघना आणि पूजा अशा दोन मुली आहेत.