रजनीकांत झाले आजोबा, मुलगी सौंदर्यानं दिला मुलाला जन्म

निर्माती सौंदर्या रजनीकांतनं आई झालीय. सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्यानं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला.

Updated: May 7, 2015, 03:21 PM IST
रजनीकांत झाले आजोबा, मुलगी सौंदर्यानं दिला मुलाला जन्म title=

मुंबई: निर्माती सौंदर्या रजनीकांतनं आई झालीय. सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्यानं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला.

रजनीकांतच्या एका जवळील सूत्रानं सांगितलं, 'अपोलो हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री मुलाला जन्म दिला. आई आणि मुलगा दोघंही स्वस्थ आहेत.' सौंदर्याचा विवाह अश्विन राजकुमार सोबत झाला.

अश्विन व्यवसायानं एक बिझनेसमन आहे. हा त्यांचा पहिला मुलगा आहे. सौंदर्याला भारताची पहिली मोशन कॅप्चर एनिमेटेड फिल्म 'कोचडियान'च्या निर्मितीचं श्रेय दिलं जातं. ज्यात तिचे वडील रजनीकांत प्रमुख भूमिकेत होते.

२०१३ साली 'कोचडियान' चित्रपटाच्या ऑडियो लॉन्चिंग कार्यक्रमात रजनीकांतनं सार्वजनिक रुपात आपली मुलगी सौंदर्याच्या कौंटुबिक आणि यशस्वी करिअरसाठी आशीर्वाद दिला होता. रजनीकांतला पहिले यात्रा आणि लिंगा असे दोन नातवंड आहेत. हे दोघं रजनीकांत यांची दुसरी मुलगी ऐश्वर्या आणि अभिनेता धनुषचे मुलं आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.