It's official! कंगना राणावतने जगासमोर मान्य केले हृतिकशी होते अफेअर

 कंगना राणावत हिने अप्रत्यक्षपणे हृतिक रोशनला 'एक्स' म्हटले आहे.  कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांचे अफेअर असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापूर्वी होती. 

Updated: Jan 28, 2016, 05:51 PM IST
It's official! कंगना राणावतने जगासमोर मान्य केले हृतिकशी होते अफेअर  title=

मुंबई :  कंगना राणावत हिने अप्रत्यक्षपणे हृतिक रोशनला 'एक्स' म्हटले आहे.  कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांचे अफेअर असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापूर्वी होती. 

या संदर्भातील माहिती आम्ही सर्वप्रथम दिली होती, पण गेल्या काही दिवसापासून त्याचं फाटलं असल्याची चर्चा बी टाउनमध्ये सुरू आहे. यापूर्वी दोघांनी कधीही आपलं एकमेकांशी अफेअर असल्याचे जाहीर केलं नव्हतं. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणावतने हृतिक रोशनवर तोंडसुख घेतले आणि त्याला 'एक्स' म्हणून संबोधले. 

सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला पण आम्हांला हे माहिती होतं. कंगना ही हृतिक सोबतच्या रिलेशनशीपबद्दल सिरिअस होती. त्यांच्या डेटिंगची बातमी जगासमोर आली होती. त्यावेळी हृतिक रोशन याने कंगनाच्या पीआरवर आरोप केला होता की पब्लिसिटीसाठी ही न्यूज पसरवली आहे. पण आता कंगनाने जगजाहीर करून हृतिकचं भांड फोडलं आहे.

काही दिवसांपूर्वी आम्ही बातमी दिली होती की, हृतिकने आपल्या पॉवरचा वापर करून टी सिरीजवर दबाव टाकला होता की, कंगनाला आशिकी -३ मध्ये घेऊ नये. तो तिच्यासोबत आता काम करू इच्छित नाही. म्हणून त्याने हे केले होते.