प्रियांका चोप्राच्या 'जय गंगाजल' चा ट्रेलर रिलीज

प्रियांका चोप्राच्या बहुचर्चित 'जय गंगाजल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Updated: Feb 12, 2016, 08:58 PM IST
प्रियांका चोप्राच्या 'जय गंगाजल' चा ट्रेलर रिलीज title=

मुंबई: प्रियांका चोप्राच्या बहुचर्चित 'जय गंगाजल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. पॉवर पॅक ऍक्शन असलेल्या या ट्रेलरमुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

बाजीराव मस्तानी, क्वांटिकोच्या यशानंतर आता प्रियांका चोप्रा 'जय गंगाजल'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ट्रेलरमध्ये पोलीस अधिकारी आभा माथुरच्या भूमिकेत असलेली प्रियांका गुन्हेगारांशी दोन हात करताना दिसत आहे. 

याआधीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता, पण त्यामध्ये साला हा शब्द होता, ज्याला सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला होता, त्यामुळे हा शब्द काढून नवा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.