सोनूच्या विमानातल्या गाण्याची क्रू मेम्बर्सना चुकवावी लागली किंमत!

जेट एअरवेजच्या फ्लाईट दरम्यान गायक सोनू निगम यानं प्रवाशांसाठी आणि क्रू मेम्बर्ससाठी गायलेलं गाणं नुकतंच वायरल झालं होतं. पण, या गाण्याची किंमत चुकवणं आता मात्र क्रू मेम्बर्सला भारी पडतंय. 

Updated: Feb 5, 2016, 01:03 PM IST
सोनूच्या विमानातल्या गाण्याची क्रू मेम्बर्सना चुकवावी लागली किंमत! title=

मुंबई : जेट एअरवेजच्या फ्लाईट दरम्यान गायक सोनू निगम यानं प्रवाशांसाठी आणि क्रू मेम्बर्ससाठी गायलेलं गाणं नुकतंच वायरल झालं होतं. पण, या गाण्याची किंमत चुकवणं आता मात्र क्रू मेम्बर्सला भारी पडतंय. 

गाण्याचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर जेट एअरवेजनं पाच एअरहोस्टेसना निलंबित केलंय. ४ जानेवारी रोजी एका कार्यक्रमाहून जोधपूरहून मुंबईला परतताना गायक सोनू निगमनं विमानात गाणं गायलं होतं. 

अनाऊन्समेन्ट माईकवर गाणं गात सोनूनं सगळ्यांना आश्चर्याचा पण सुखद धक्का दिला होता. यासाठी क्रू मेम्बर्सनं सोनूला गाण्याची विनंती करत प्लेनचं अनाऊन्समेन्ट सिस्टम दिला होता.