जस्टीन बीबर रात्रीतूनच गुपचूप भारत सोडून निघून गेला

पॉप स्टार जस्टीन बीबरचा फीवर भारतात दिसला.

Updated: May 11, 2017, 03:01 PM IST
जस्टीन बीबर रात्रीतूनच गुपचूप भारत सोडून निघून गेला title=

मुंबई : पॉप स्टार जस्टीन बीबरचा फीवर भारतात दिसला. जस्टीनने मुंबईच्या डी.वाय स्टेडिअममध्ये ९० मिनिटांमध्ये २० गाणे सादर केले. या शोमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली. पण कॉन्सर्ट संपताच इतर सगळे प्लान सोडून जस्टीन बीबर मायदेशी परतला आहे. आज सकाळी तो आग्रा येथे जाणार होता. 

दिल्ली, आग्रा आणि जयपूरला तो जाईल असा प्लान होता. पण कॉनसर्टच्या रात्रीच दो भारतातून निघून गेला. अशी बातमी आहे. 

जस्ट‍िन बीबरच्या कॉनसर्टनंतर बॉलिवूड त्याच्यासाठी एका पार्टीचं आयोजन करणार होता. जॅकलीन फर्नांडीस त्याच्यासाठी पार्टी देणार होती अशी चर्चा होती तर शाहरुख खान आणि सलमान खान देखील जस्ट‍ीन बीबरच्या पाहुणचारासाठी उत्सूक होते. पण तो रात्रीच त्याच्या प्रायव्हेट प्लानने निघून गेला.

कॅनडाचा सिंगर २३ वर्षीय जस्टीन बीबरची जादू भारतात चालली. लाईव्ह परफॉर्मेंससाठी हजारो चाहत्यांनी हजेरी लावली. मीडिया रिपोर्टनुसार जस्टीनच्या या ९० मिनिटांच्या शोसाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च झाले. सेटअपवर जवळपास २६ कोटी, बीबरची फी, ट्रॅवलिंग, हॉटेल आणि इतर मागण्यांवर २५ ते ३० कोटी रुपये खर्च झाले.