मुंबई : मुंबईत आपल्या डोक्यावर छप्पर शोधणं हे एक महाकठिण काम आहे... पण, जेव्हा यामध्ये तुमची जात, धर्म, लिंग, ओळख, रंग असे अनेक अडचणींचाही समावेश होतो, तेव्हा मात्र मानसिक त्रास होतो...
अशाच मानसिक त्रासातून सध्या अभिनेत्री कल्कि कोचलीन प्रवास करतेय... तिला नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय... कारण, मुंबईच्या वर्सोवा भागात कल्कि सध्या एका घराच्या शोधात आहे.
वर्सोवा हा मुंबईचा एक सफेदपोश भाग... अनेक नामवंत हस्तींचं राहण्याचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं... इथल्या बड्या-बड्या बंगल्यांमध्ये बॉलिवूडच्या अनेक ताऱ्यांनीही आपलं आभाळ थाटलंय... असंच काहीसं स्वप्न घेऊन आलीय कल्कि कोचलीन... पण, तिचं काही स्वप्न पूर्ण होताना दिसत नाहीय.
कल्किला सध्या घरचं मिळत नाहीय... तिनं आपलं हे दु:ख सोशल वेबसाईट ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी शेअर केलंय... ‘एक गोरी, एकटी आणि खासकरून बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या महिलांना वर्सोवामध्ये भाड्यानं फ्लॅट शोधणं काही साधं-सधं काम नाही’.
Being white, single, a woman and working in Bollywood it's not easy finding a flat to rent in Versova!
— Kalki Koechlin (@kalkikanmani) October 27, 2014
तुम्हीही कल्किचे फॅन्स असाल तर पाहा, काही मदत करता येतेय का ते...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.