थिएटरमध्ये पीएसआय 'गायतोंडे'ला का शिव्या पडतायत?

'दृश्यम' सिनेमात पीएसआय गायतोंडेला भरभरून शिव्या पडतायत, आणि असं म्हणतात की, खलनायकाला जेव्हा बाया बापड्या शिव्या घालतात, तेव्हाच त्या कलाकाराने सर्वोत्कृष्ट खलनायकाची भूमिका वठवलेली असते. दिग्दर्शक निशिकांत कामतच्या दृश्यम सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय.

Updated: Aug 2, 2015, 07:09 PM IST
थिएटरमध्ये पीएसआय 'गायतोंडे'ला का शिव्या पडतायत? title=

मुंबई : 'दृश्यम' सिनेमात पीएसआय गायतोंडेला भरभरून शिव्या पडतायत, आणि असं म्हणतात की, खलनायकाला जेव्हा बाया बापड्या शिव्या घालतात, तेव्हाच त्या कलाकाराने सर्वोत्कृष्ट खलनायकाची भूमिका वठवलेली असते. दिग्दर्शक निशिकांत कामतच्या दृश्यम सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय.

दृश्यम गायतोंडेच्या भूमिकेशिवाय 
दृश्यम सिनेमात काम करणारा पोलिस उपनिरिक्षक गायतोंडेने खलनायकाची अशी काही भूमिका वठवली आहे की, दृश्यम सिनेमा अख्खा गायतोंडे म्हणजेच कमलेश सावंतने खेचून नेल्यासारखा आहे.

स्टारकास्ट फिकी पडलीय
सिनेमातली स्टारकास्ट त्याच्यासमोर फिकी पडली आहे. कमलेश सावंत म्हणजेच सिनेमात पीएसआय गायतोंडे का शिव्या खातोय, हे तु्म्हाला पाहायचं असेल, तर तुम्हाला दृश्यम सिनेमा नक्कीच पाहावा लागेल.

पोलिसांचे वाईट अनुभव आठवतील
कमलेश सावंतने गायतोंडे असा वठवलाय की, पोलिसांमध्ये असलेल्या काही वाईट अनुभवाची तुम्हाला नक्की आठवण होईल, गायतोंडे सारखा अतिशय धडधाकट आणि क्रूर पोलिस दाखवण्यात आला, तरी प्रभूंसारखे दयाळू पोलिस अधिकारीही दृश्यममध्ये आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.